अजित पवारांना पुतण्या देणार शह! आगामी निवडणुकीसाठी पवार कुटुंबातील ‘या’ सदस्याची चर्चा

Shah will give nephew to Ajit Pawar! Discussion of 'this' member of the Pawar family for the upcoming elections

राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) बंड करत दुसरा भूकंप घडवून आणला आहे. एकेकाळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात असणारे अजित पवार अचानक सत्तेत सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खूप मोठा धक्का बसला आहे. अशातच त्यांनी आपल्याकडे सर्वात जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे नेते अजित पवार यांच्या गटात गेल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)

ब्रेकिंग! छगन भुजबळ यांच्यानंतर धनंजय मुंडेंनाही जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

पक्षाच्या फुटीनंतर आता पवार कुटुंबात फुट पडल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांचे पुतणे आणि बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे पक्षात दोन गट पडले आहेत. त्यामुळे पक्षाला नव्या चेहऱ्याची गरज असून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू तर 12 जण गंभीर

अजित पवार आणि श्रीनिवास पवार (Srinivas Pawar) सख्खे भाऊ असून युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. रोहित पवार यांच्यानंतर आता युगेंद्र पवार राजकारण सक्रिय होऊ शकतात. ते अनेकवेळा शरद पवारांच्या सोबत दिसले आहेत. मागील काही दिवसांपासून ते बारामतीतील वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.

Onion Price Hike । शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी! कांद्याच्या दरात झाली विक्रमी वाढ

Spread the love