मुंबई : शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामन्याच्या मुलाखतीत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. काय झाडी ,काय डोंगर ,काय हॉटेल या या डायलॉग मुळे प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला कसे आले असा प्रश्न विचारला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विधान थेट आपल्या काळजाला लागले असे एका वृत्तसंस्थेशी बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले. आमच्या गावरान भाषेवर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही असं बापूंनी ठाकरेना सूनावल.
“संजय राऊत हे कधी जनतेसमोर गेलेच नाही. व शरीर, बुद्धि, मन कुचक आहे. तेच आदित्य ठाकरे यांना काय बोलावं हे शिकवतात. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी असं बोलावं महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेचा अपमान आहे”. असे शहाजी बापू पाटील म्हणाले.
“आमच्या गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. त्यांच महाराष्ट्रात जन्माला का आलात हे विधान माझ्या काळजाला लागलं. महाराष्ट्राबद्दल मी काही बोललोच नव्हतो. आसाममधील निसर्गाचं कौतुक करणं काही चूक नाही. ही राष्ट्रीय एकात्मकता आहे. महाराष्ट्र आहे म्हणून राष्ट्र आहे, आणि राष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र आहे”, असं शहाजीबापूंनी सांगितल.
उद्धव ठाकरे सारख्या जबाबदार व्यक्तीने कोणताही विचार न करता ही टीका केली. आज आसामवर केली उद्या राजस्थान वर, परवा कश्मीर वर करतील. रागीट आणि चिडखोर स्वभावामुळे ठाकरेंना काय बोलावं आणि काय सांगावं याचे भान राहिले नाही, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली.