
मुंबई : अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझनच्या आठव्या भागात दिसणार आहेत. नुकताच या एपिसोडचा प्रोमो रिलीज करण्यात आलाय. शाहिद कपूरसोबत कियारा अडवाणी (Kiara Advani) देखील या भागात दिसणार आहे. यावेळी शाहिद आणि कियाराला त्यांच्या चित्रपट आणि आगामी प्रोजेक्टबद्दलही विचारलं. शाहिद आणि कियाराने करणच्या अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.
Irfan Pathan: मुंबईच्या विमानतळावर माजी अष्टपैलू इरफान पठाणला वाईट वागणूक
या शोमध्ये शाहिदने त्याच्या आणि त्याची पत्नी मीराच्या भांडणाचं कारण सांगितलं. यावेळी शाहिद म्हणाला, “मी आणि मीरा दररोज रात्री पंख्याच्या स्पीडवरून भांडतो. आमच्यात असे शुल्लक मतभेद असूनही मीरा माझ्या जीवनाचा एक भाग आहे, याचा मला आनंद आहे. मीरा ही माझ्या आयुष्यात घडलेली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. ती माझ्या आयुष्यात खूप काही घेऊन आली आहे. ती मला पूर्ण करते. आम्हाला दोन सुंदर मुलं आहेत आणि आयुष्य छान वाटतंय,”
Mumbai: आज मुंबईत पार पडणार मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक
दरम्यान, करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये आतापर्यंत जान्हवी कपूर-सारा अली खान, अक्षय कुमार-सामंथा रुथ प्रभु, आलिया भट्ट-रणवीर सिंह, आमिर खान-करीना कपूर, विजय देवरकोंडा-अनन्या पांडे अशा अनेक कलाकारांनी हाजरी लावली आहे.