चित्रपट व मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री व अभिनेत्यांची लोकांमध्ये वेगळीच क्रेझ असते. त्यांचे चाहते देखील भरपूर असते. हे चाहते कधीकधी अगदी भारावून टाकणारी कृती करत असतात. नुकताच शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याच्या एका चाहतीची ( Young Fan) कृती पाहून नेटकरी तर थक्कच आहेत मात्र स्वतः शाहिद कपूर देखील थक्क झाला आहे. (Shahid Kapoor’s video went viral on social media)
सामान्यतः आपल्याला आवडता अभिनेता आपल्याअमोर आला की आपण त्याचे बोलून कौतुक करतो. शक्य असेल फार फार तर सेल्फी काढतो. या व्हिडीओमध्ये शाहिद कपूरची एक चाहती त्याला भेटण्यासाठी उत्स्फूक दिसत आहे. सुरुवातीला ती खुश होऊन शाहिद सोबत सेल्फी काढते. मात्र त्यापुढे ती अचानकच शाहिद समोर वाकून त्याच्या पाया पडते.
Sharad Pawar: महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही? शरद पवारांच्या त्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात संभ्रम
ही तरुणी जेव्हा शाहिद कपूरच्या पाया पडते तेव्हा शाहीद आपसूकच मागे होतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. वाकून नमस्कार करण्याची गरज काय? तो अभिनेता आहे, देव नाही, प्रेम आणि आदर दाखवण्याचे इतर मार्ग आहेत. तुला पाया पडायचे असेल तर आई-वडिलांच्या पाया पड. अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.