मुंबई : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाझ गिलला (Shahnaz Gill) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. या अभिनेत्रीला पंजाबची कतरीना कैफ म्हणून देखील ओळखलं जातं. खासगी आयुष्याबद्दल शहनाझ कायम चर्चेत असते. नुकतीच ही अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. शहनाझ गिल पुन्हा प्रेमात असल्याच्या चर्चा होत असून तिचं नाव एका अभिनेत्याशी जोडलं जात आहे.
शहनाझ लवकरच सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध डान्सर राघव जुयालदेखील (Raghav Juyal) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. माहितीनुसार, शहनाझ आणि राघव या दोघांमध्ये मैत्री पलिकडे काही असल्याचं बोललं जात आहे. दोघांमध्ये जवळीक वाढली असून खूपवेळा हे दोघे सार्वजनिक ठिकाणी दिसले आहेत.
या दोघांच्या अफेअर्सबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहेत. पण त्यांनी या नात्यावर अद्याप भाष्य केलेलं नाही. दोघे एकमेकांना पसंत करतात पण अफेअर्सच्या चर्चांवर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही.