शाहरूखच्या चित्रपटाचे चक्क औरंगाबादमध्ये होणार शूटिंग; बिडकीन मधील ‘डीएमआयसी’त चाहत्यांची गर्दी

Shahrukh's film will be shot in Aurangabad; Crowd of fans at 'DMIC' in Bitcoin

औरंगाबाद: बॉलिवूड मध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan) याची ‘किंग खान’ अशी ओळख आहे. शाहरुखने आजपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत ‘एक से बडकर एक’ भूमिका करून नाव कमावले आहे. यामुळे त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ‘जवान’ या अगामी चित्रपटातून शाहरुख खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पूर्णतः ऍक्शनपट असणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू होणार असून त्यातील काही दृश्ये बिडकीन येथील ‘डीएमआयसी’त चित्रित होणार आहेत.

एमपीएससी पास नाही झाला तर आमदार, खासदार होता येतं – गोपीचंद पडळकर

‘जवान’चे या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण कुमार (Director Arun Kumar) उर्फ ॲटली हे करणार आहेत. या चित्रपटात नयनतारा ही अभिनेत्री देखील प्रमुख भूमिकेत असणार आहे. येत्या जून 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘जवान’ ( Shooting of Javan) च्या चित्रीकरणाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. पुणे, हैदराबाद, मुंबई, चेन्नई यांसारख्या मेट्रो शहरांत या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. दरम्यान चित्रपटातील भरधाव गाड्यांचा थरार शूट करण्यासाठी मेट्रो शहरात जागा नसल्याने त्यासाठी औरंगाबाद जवळच्या बिडकीनची निवड करण्यात आली आहे. यासाठी लागणारी सर्व यंत्रणा बिडकीन येथे पोहोचली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे वायुदलाचे हेलिकॉप्टर बारामतीमधल्या गावात; अचानक उडाली खळबळ

औरंगाबाद सारख्या ठिकाणी शाहरुख खानच्या चित्रपटाचे शूटिंग म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच ! यामुळे किंग खानच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याची माहिती मिळताच बिकडीन येथे चाहत्यांनी गर्दी केली. ही गर्दी आवरण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इतकंच नाही तर खास शूटिंगसाठी डीएमआसीतील सर्व अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत.

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा ED च्या धारेवर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *