बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) सतत चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा पठाण (Pathan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटावरून बराच वाद चालला होता. परंतु बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. अशातच आता त्याची मुलगी सुहाना खान 9Suhana Khan) चर्चेचा विषय बनली आहे. कारण तिने अलिबागमध्ये जमीन घेतल्याची चर्चा सुरु आहे.
भीषण अपघात! नवऱ्याच्या डोळ्यादेखत बायकोचा कारमध्ये होरपळून मृत्यू; हृदय हेलावून टाकणारी घटना
शाहरुखची अगोदरच अलिबागमध्ये प्रॉपर्टी आहे. अशातच आता सुहानाने देखील अलीबाग (Alibaug) येथील थाल या गावात दीड एकर शेती खरेदी केली आहे. त्यापैकी 2218 स्क्वेअर फूट शेतीवर कंन्स्ट्रक्शनचे काम केले आहे. किमतीचा विचार केला तर या जमिनीची किंमत 12 कोटी 91 लाख इतकी आहे. जमिनीसंदर्भात सर्व व्यवहार झाले असून सुहानाकडून 77 लाख 46 हजार रुपयांची स्टँम्प ड्युटी भरण्यात आली आहे.
मोदींना देशाची तर सोनिया गांधी आणि शरद पवारांना स्वतःच्या मुलांची काळजी; बावनकुळे विरोधकांवर बरसले
मागील काही दिवसांपूर्वी ती जोया अख्तरच्या द आर्चीज (The Archies) या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे अशी चर्चा सुरु होती. त्याचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. या सिनेमात खुशी कपूर आणि अगस्तय नंदा दिसणार आहे. परंतु या सिनेमापुर्वी सुहानाने जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे ती आता बॉलिवूडमध्ये (Bollywood) दिसणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! क्रिकेट विश्वावर शोककळा; ‘या’ बड्या खेळाडूच दुःखद निधन