Shailesh Lodha । ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ulta Chashma) ही मालिका घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र खळखळवून हसायला भाग पाडते. ही मालिका मागील काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता शैलेश लोढा यांनी १४ वर्षे काम केल्यानंतर २०२२ मध्ये मालिका सोडली. त्यानंतर त्यांनी निर्मात्यांबाबत खळबळजनक दावे केले आहेत. (Latest Marathi News)
NCP । शरद पवार गटाला मोठा दणका! केंद्रीय पातळीवर अजित पवार गटाची वाढली ताकद
“मला सब टीव्हीवरील ‘गुड नाईट इंडिया’ या स्टँड-अप शोमध्ये पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते तेव्हा असित मोदींनी (Asit Modi) आपल्याला वाईट वागणूक दिली आणि त्या शोचा भाग असल्याबद्दल खूप अपमानितदेखील केले. एवढेच नाही तर एकदा शोमध्ये असित मोदी यांनी कलाकारांना एखाद्या नोकरांप्रमाणे अपमानास्पद वागणूक दिली होती, असा दावा शैलेश लोढा यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
NCP । शरद पवार गटाला मोठा दणका! केंद्रीय पातळीवर अजित पवार गटाची वाढली ताकद
“सोशल मीडियावर बोलण्यापूर्वी किंवा मीडियाशी बोलण्यापूर्वी त्यांची परवानगी का घ्यायची? ते माझे मूलभूत अधिकार असून मी शो सोडल्यानंतर त्यांचं का ऐकायच? हा मुद्दा पैशांचा नव्हता तर ते अपमानास्पद भाषेत कसे बोलले याचा होता. त्यामुळे मला न्यायालयात जावे लागले आणि त्यावर तोडगा निघाला,” असेही शैलेश लोढा यांनी स्पष्ट केले आहे.
BJP । निवडणुकांपूर्वीच भाजपला मोठा धक्का! सर्वात मोठा पक्ष एनडीएतून बाहेर