Politics News । राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा धक्का, पुतण्याने सोडली साथ

Politics News

Politics News । पुणे : राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) पार पडणार आहेत. निवडणूक आयोग कधीही निवडणुकीची तारीख जाहीर करू शकते. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) मोठी फूट पडली आणि राज्यात काका आणि पुतण्यामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीच्या आणखी एका एका काका पुतण्यामध्ये संघर्ष सुरु झाला आहे. (Latest marathi news)

Manoj Jarange Patil । “…तेव्हा अजित पवारांच्या गळ्यात उडी मारणार”, जरांगे पाटलांचा इशारा

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांचे पुतणे शैलेश मोहिते (Shailesh Mohite) यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर दिलीप मोहिते पाटील यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी तळेगाव दाभाडे येथे शैलेश मोहिते यांनी पक्षात प्रवेश केला.

OnePlus चा नवा स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार, बजेट तयार करण्यापूर्वी जाणून घ्या फीचर्स

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे (Ajit Pawar) निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर अजित पवार गटाला जणू काही गळतीचं लागली आहे, असे बोलले जात आहे. कारण वाघेरे यांच्या ठाकरे गटातील पक्ष प्रवेशानंतर अनेकजण अजित पवारांची साथ सोडत आहेत. ही अजित पवारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

Beed News । बंगल्यात सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी टाकली धाड; धक्कादायक माहिती समोर

Spread the love