जलयुक्त शिवार योजना (Jalyukta Shivar Scheme) ही शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे पाणी उपलब्ध होते त्या पाण्यावर शेतकरी वेगवेगळे उत्पादन घेत असतात. या जलयुक्त शिवार योजनेने 5000 पेक्षा जास्त गावांना पाणी उपलब्ध करून दिल आहे. परंतु मध्यंतरी काही वादविवादावरून ही योजना बंद करण्यात आली होती. परंतु जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे .याची घोषणा शंभूराजे देसाई यांनी केली आहे.
Murder case | विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठी प्रेयसीचा खून; गुगल सर्चमुळे गुन्हेगार अडचणीत!
जलयुक्त शिवार योजना ही आजपासून सुरू होणार आहे. व या योजनेतून शेती समृद्ध करण्याचा हेतू सरकारचा आहे. मध्यंतरी या योजनेमध्ये काही घोटाळे झाल्याने पंकजा मुंडे यांची चौकशी करण्यात आली होती. परंतु आजपासून जलयुक्त शिवार योजना सुरू होणार असल्याचं शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी जाहीर केलं आहे. या योजनेमध्ये जेसीबी ट्रॅक्टर पोकलेन मशीनला डिझेल परतावा मिळणार आहे.
शंभूराज देसाई म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेचा हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. गाळमुक्त धरण योजना राबवण्यात येणार असून या माध्यमातून गाळमुक्त शिवार होईल. व फडणवीस सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्रांना गती देखील मिळेल. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साठवून ते जमिनीत मुरवून शिवार समृद्ध केलं जाईल.