मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde)बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर महिनाभराचा कालावधी लोटून गेल्यावर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यामध्ये अनेक अपेक्षित नेत्यांना मंत्रीपद मिळालेले नाही. यामुळे अनेक नेते नाराज आहेत अस म्हटल जात आहे. यामध्ये शिंदे गटातील दादा भुसे (dada bhuse), संदीपान भुसे(Sandipan bhuse) यांची नावे प्रामुख्याने घेतली जात आहेत.
यावरूनच पत्रकारांसोबत 16 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये बोलताना शिंदे गटातील मंत्री शंभुराजे देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. यावेळी बोलताना शंभुराजे देसाई म्हणालेले आहेत की, “आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कुणी मिळालेल्या खात्याबाबत नाराज आहोत असं व्यक्त झालं आहे का? आमच्यापैकी कुणीही असं व्यक्त झालेलं नाही, मत प्रदर्शित केलेलं नाही.”
पुढे बोलताना ते म्हणालेत की, जाणीवपूर्वक अशा वावड्या उठवल्या जात आहेत. असं का होतंय हे आम्हालाही समजत नाही. आम्ही पहिल्या टप्प्यात शपथ घेतलेले शिवसेनेचे नऊ मंत्री आहोत. या मंत्र्यांकडे कोणते विभाग द्यायचे हा पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार आहेत.
याचसोबत “आम्ही शिवसेनेचे ४० आमदार आणि ११ अपक्ष आमदार सर्वांनी पहिल्याच दिवशी आम्हाला मंत्रिमंडळात घ्यायचं का नाही, घेतल्यावर कोणतं खातं द्यायचं या सर्व बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे आमचे कुणीही मंत्री असं बोलत नाहीत. ते स्वतः बोलत नसताना कुणीतरी अशा वावड्या उठवत आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जी खाती दिलीत त्याचं काम त्यांना अभिप्रेत आहे असं करणं यावरच आमचा भर आहे. आम्ही कुणीही नाराज नाही,” अस देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितलेले आहे.