सरकारला लाज वाटली पाहीजे, राजू शेट्टींची बोचरी टीका

Shame on the government, Raju Shetty's stupid criticism

मागच्या २५ वर्षात पहिल्यांदाच शेतकऱ्यांबद्दल सरकारचा बेजबाबदारपणा मी पाहतोय. सरकारला लाज वाटली पाहीजे अशी बोचरी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. उसाला योग्य दर मिळत नसल्यामुळे सध्या राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आह. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राज्यात ऊस परिषदेचे आयोजन करत आहेत. आता राहुरी या ठिकाणी एक ऊस परिषद घेण्यात आली होती. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी कारखानदारांवर देखील गंभीर आरोप केले आहेत.

मोठी बातमी! गौतमी पाटील राजकारणात येणार का? चर्चाना उधाण

राजु शेट्टी म्हणाले, कारखान्यांच्या काट्यामध्ये शेतकऱ्यांच्या उसाची मोठ्या प्रमाणात लुटमार होते. राज्यातील साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन करावेत या मागणीसाठी येत्या 7 तारखेला पुण्यात साखर आयुक्तालयावर देखील भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

17 आणि 18 नोव्हेंबरला ऊस वाहतूक बंद पाडणार राजू शेट्टींनी दिला गंभीर इशारा; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

त्याचबरोबर यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देत हंगाम संपल्यानंतर 350 रूपये द्यावेत अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली. तसेच या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येत्या 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असल्याचा गंभीर इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Sharad Pawar: शरद पवारांना आज डिस्चार्जची शक्यता नाही

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *