
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी गुवाहाटीला जाऊन बंड पुकारले होते. यावेळी राजकीय वर्तुळात धुमाकूळ मजला होता.दरम्यान एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी की उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी हा वाद सुरू होता. दरम्यान आता शिवसेनेच्या आणि शिंदे गटाच्या वादात अजून एक करणाची भर पडली ती म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा.
अनेक वर्षांपासून होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावर आता शिंदे गटाकडून दावा केला जात आहे.
आनंददायक! शेतकऱ्यांना ‘या’ योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के अनुदान; वाचा सविस्तर
त्यामुळे शिंदे गटाला उद्देशून दसरा मेळाव्याविषयी बोलताना आदित्य ठाकरे यांनी एक वक्तव्य केले आहे.शिवसेनेवर आपली निष्ठा आहे, ठाकरे घराण्यावर आपली श्रद्धा आहे असं म्हणणाऱ्यांचे बुरखे फाटले आहेत.शिंदे गटाच्या राजकारणात आता निर्लज्जपणा वाढला असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली.पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की,जे अचानक शिवसेनेचा दसरा मेळावा आपला आहे असा दावा दाखल करताहेत त्यांचाही मुखवटा फाटल्याशिवाय राहणार असंही त्यांनी यावेळी सांगितले.
धुक्यांमुळे पिकांवर होतो ‘हा’ परिणाम, करा हे उपाय
शिवसेनेच्या दसरा मेळावा
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 56 वर्षांची परंपरा आहे. शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क या मैदानावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका दरवर्षी मांडली आणि ती पूर्ण देशात गेली आहे.