Sharad Mohal । पुणे (Pune Crime News ) शहराला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी ही वाढतच चालली आहे. अनेक मोठमोठे गुन्हे हे पुणे शहरात वाढतच आहेत. काल देखील शुक्रवारी पुण्यात रक्तरंजित थरार घडला. शरद मोहोळ याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. (Sharad Mohal Case Update )
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर यांच्यासह ८ जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. आरोपी मुन्ना उर्फ संतोष पोळेकर याने शरद मोहोळ याची हत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुन्नाच शरद मोहोळ याच्यासोबत मोठे वाद झाले होते. जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाले होते. यामुळेच मुन्ना याने शरद मोहोळ याच्या हत्येचा कट रचला.
Sharad Mohol । ब्रेकिंग! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये सुतारदरा या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी शरद मोहोळ यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये शरद मोहोळ जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना घडताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आतापर्यंत पोलिसांनी जवळपास आठ आरोपींना अटक केल्याची माहिती मिळत आहे.
कोण होता शरद मोहळ? (Who was Sharad Mohal?)
शरद मोहोळ हा मुळशी तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील होता. त्याचे आई-वडील शेतकरी असून त्याची घरची परिस्थिती देखील हालाखीची होती. शरदने गुन्हेगारी क्षेत्रात सुरुवातीला कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा ड्रायव्हर म्हणून काम केले. मात्र संदीप मोहोळची ज्यावेळी हत्या झाली त्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारूपास आला. शरद मोहोळ यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
Aditya Thackeray । आदित्य ठाकरे यांनी केला सर्वात मोठा खळबळजनक दावा!