
Sharad Mohal । पुण्यात शुक्रवारी रक्तरंजित थरार घडला. दिवसाढवळ्या पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. कायम सोबत असणारे साथीदारच शरद मोहळसाठी काळ बनून आले आणि त्याचा खून केला. 5 जानेवारी 2024 रोजी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी कोथरूडच्या सुतारदरा परिसरात रक्तरंजित थरार घडला. काही क्षणातच कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू झाला. (Who is Munna Polekar)
शरद मोहोळचा खून त्याच्या साथीदारांनीच केला असल्याचे बोलले जात आहे. मुन्ना पोळेकर असं त्याच्या एका साथीदाराचे नाव आहे. मुन्ना पोळेकर याने शरद मोहोळचा खून का केला? नेमका कोण आहे हा आरोपी जाणून घेऊया….(Why Munna Killed Sharad Mohol)
Nitesh Rane । बिग ब्रेकिंग! भाजप आमदार नितेश राणे यांनी घेतली शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट
कोण आहे मुन्ना पोळेकर? (Who is Munna Polekar)
मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा फक्त २० वर्षांचा आहे. तो मुळशीत राहत असून शरद मोहोळ हा त्याचा खूप खास दोस्त असल्याचे बोलले जात आहे. माहितीनुसार, या दोघांमधील वाद फार जुना आहे शरद मोहोळ आणि मुन्नाचे पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाले होते. पुणे जवळील मुळशी तालुक्यातील एका जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. मुन्नाच्या या गुन्ह्यामध्ये त्याच्या मामाचा देखील सहभाग झाला होता.
मुन्नाचा मामा कोण?
नामदेव कानगुडे असे मुन्नाच्या मामाचे नाव आहे. शरद मोहोळला कसे संपवायचे हे ठरले त्यावेळी कानगुडे देखील यामध्ये सहभागी झाला होता. जमिनीच्या व्यवहारातून मुन्नाच्या मामाचे म्हणजेच नामदेव कानगुडीचे आणि मोहोळचे देखील खटके उडाले होते आणि भाच्याच्या गुन्ह्यात मामाने ही साथ दिली आणि मोहळला संपवण्याचा डाव आखला.
Sharad Mohol । ब्रेकिंग! शरद मोहोळ हत्या प्रकरणानंतर आमदार धंगेकर यांचा गंभीर आरोप!
मुन्ना शरद मोहोळच्या गॅंग मध्ये कसा गेला?
खऱ्या अर्थाने मुन्ना हा दुसऱ्या गटाचा टिपर होता. मात्र मोहोळची हत्या करण्यासाठी मुन्नाला मोहोळच्या टोळीत सामील व्हावं लागलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना पोळेकर हा मोहोळ यांच्यासोबत महिनाभरापासून टोळीचा सदस्य म्हणून काम करत होता. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मुन्ना कोळेकर आणि शरद मोहळ सोबतच होते अशी देखील माहिती समोर आली आहे. (How Munna Join Sharad Mohol Gang)
Viral video । संतापलेल्या म्हताऱ्याने थेट तरुणाला घातली गोळी, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
5 जानेवारीला मोहळच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि या दिवशी तो दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला निघाला होता. यावेळी त्याचे साथीदार देखील सोबत होते. मात्र घरापासून काही अंतर दूर जातात साथीदारांनी त्याचा गेम केला. आरोपींनी पळ काढल्यानंतर पोलिसांच्या पथकांनी या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच केवळ 8 तासांत शिरवळला पळून जात असतानाच या सगळ्या आरोपींना बेड्या ठोकल्या.