Sharad Mohol Case । ब्रेकिंग! शरद मोहोळच्या पत्नीने फडणवीसांची भेट घेऊन केली ‘ही’ मोठी मागणी

Sharad Mohal

Sharad Mohol Case । पुणे शहरामध्ये भर दिवसा रक्तरंजित थरार घडला आहे. कारण पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये कुख्यात गुंड शरद मोहळचा (Sharad Mohal) गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला. गोळ्या झाल्यानंतर शरद मोहोळ याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने पुणे शहर चांगलेच हादरले आहे. (Sharad Mohal Murder Update) दरम्यान आता शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Sharad Mohol Wife) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली आहे.

Yash Birthday । KGF स्टार यशचे वडील अजूनही बस ड्रायव्हर, संघर्षाची कहाणी वाचून व्हाल थक्क

मोहळ याच्या पत्नीने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ज्यावेळी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ होते. त्यावेळी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. त्याचबरोबर शरद मोहळच्या पत्नीने भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यावर अनेकांनी जोरदार टीका देखील केली होती.

Sharad Mohal । शरद मोहळची हत्या का झाली? भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या माध्यमातून शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार अशा देखील चर्चा सुरु होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, स्वाती मोहोळ यांनी डीपी रोडवरील पुणे शहर (Pune News) भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. स्वाती मोहोळ या पुणे भाजपच्या पदाधिकारी असून त्यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून चर्चांना उधाण आले आहे.

Sharad Mohol । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद मोहोळच्या पत्नीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

Spread the love