Sharad Mohol fired । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! पुण्यातील गुंड शरद मोहोळवर गोळीबार

Sharad Mohal

Sharad Mohol fired । सध्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यात गुंड म्हणून ओळख असणाऱ्या मोहोळवर असा जीवघेणा हल्ला झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी शरद मोहोळ याच्यावर गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये शरद मोहोळ याला तीन गोळ्या लागल्या आहेत. (Firing On Sharad Mohol In Kothrud Pune)

ED Team Attacked । ब्रेकिंग! छापा टाकण्यासाठी निघालेल्या EDच्या पथकावर हल्ला, गावकऱ्यांनी गाडीच्या काचा फोडल्या अन्…

अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला केला असून शरद मोहोळ यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु गॅंगवार प्रकरणातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली आहे.

Gautami Patil । ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच गौतमी पाटीलवर भडकले लोकं

पुण्यातील कोथरूड परिसरात नेहमीच गर्दी असते. हा परिसर कायम गजबजलेला असतो. मात्र या ठिकाणी अज्ञातांनी शरद मोहोळ याच्यावर एका मागे एक तीन गोळ्या झाडल्या. यामधील एक गोळी त्याच्या खांद्यावर लागली आहे. गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार झाले आहेत. सध्या पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.

Rohit Pawar । रोहित पवारांना सर्वात मोठा धक्का! बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ईडीची छापेमारी

Spread the love