Sharad Mohol | ब्रेकिंग न्यूज! गोळीबारात गंभीर जखमी झालेला गुंड शरद मोहोळचा उपचारांदरम्यान रुग्णालयात मृत्यू

Sharad Mohal

Sharad Mohol | सध्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यात गुंड म्हणून ओळख असणाऱ्या मोहोळवर असा जीवघेणा हल्ला झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी शरद मोहोळ याच्यावर गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये शरद मोहोळ याला तीन गोळ्या लागल्या आहेत. (Firing On Sharad Mohol In Kothrud Pune)

Sharad Mohol fired । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! पुण्यातील गुंड शरद मोहोळवर गोळीबार

गोळीबारानंतर गुंड शरद मोहळ जखमी झाला त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र आता रुग्णालयात उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी कोथरूड परिसरात बाईकवरुन हल्लेखोर आले होते त्यांनी शरद मोहोळवर गोळीबार केला. त्यांनी शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या. ससून रुग्णालयात शरद मोहोळ याचा मृत्यू झाला आहे.

Gautami Patil । ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच गौतमी पाटीलवर भडकले लोकं

दरम्यान, पुण्यातील कोथरूड परिसरात नेहमीच गर्दी असते. हा परिसर कायम गजबजलेला असतो. मात्र या ठिकाणी अज्ञातांनी शरद मोहोळ याच्यावर एका मागे एक तीन गोळ्या झाडल्या. यामधील एक गोळी त्याच्या खांद्यावर लागली आहे. गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार झाले आहेत. सध्या पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.

Rohit Pawar । रोहित पवारांना सर्वात मोठा धक्का! बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ईडीची छापेमारी

Spread the love