
Sharad Mohol । पुण्यामध्ये शुक्रवारी कोथरूड भागात भरदिवसा गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. यानंतर राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. त्याचबरोबर गृह खात्याच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुण्यामध्ये मागच्या काही दिवसापासून गुन्हेगारी वाढत चालली आहे. या वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्षाने अनेक गुंडांना आश्रय दिल्याची टीका आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. (Sharad Mohol Murder Case)
Viral video । संतापलेल्या म्हताऱ्याने थेट तरुणाला घातली गोळी, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
कोथरूड भागामध्ये साहित्यिक कलावंत वास्तव्यास आहेत. अनेक महत्त्वाच्या संस्था देखील कोथरूड परिसरामध्ये आहेत. या ठिकाणी शिक्षणासाठी अनेक वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी वास्तव्यास आहेत. अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळाली आहेत. कोथरूड सह पुणे शहरांमधील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची सध्या गरज आहे. त्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत असं धंगेकर म्हणाले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले आहेत.
आमदार धंगेकर यांनी आज सोमवारी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची देखील भेट घेतली असून. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससूनचे तत्कालीन अधीक्षक डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.