
Sharad Mohol Murder | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्या प्रकरणामुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हत्येनंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला होता. दरम्यान आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुन्ना पोळेकर हा फक्त मोहरा होता हे समोर आले आहे. कारण या हत्या प्रकरणाचा मास्टर माईंड रामदास मारणे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
पोलिसांनी मुख्य आरोपी रामदास मारणे सह त्याच्या साथीदारांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पनवेल या ठिकाणाहून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. यामधील तीन जण हे आरोपी आहेत तर तीन जण संशयापद असल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी गोळ्या घालणाऱ्या आरोपीला पकडलं होतं मात्र येते मागचा खरा मास्टरमाइंड वेगळा कोणतरी असल्याचा संशय पोलिसांना होता. अखेर पोलिसांनी या आरोपीला पकडलं असून त्याची चौकशी केली जात आहे. रामदास मारणे नेमका कोण? याचा मारणे टोळीशी काही संबंध आहे का? त्याचबरोबर शरद मोहोळ याची हत्या का केली? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.