
Sharad mohol murder case | गँगस्टर शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर पुणे शहर चांगलेच हादरले. पुण्यामध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणांमध्ये अनेक मोठमोठे खुलासे देखील होत होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या तीन आठवड्यापासून तो फरार होता. मात्र सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. गणेश मारणे हाच खरा सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. (Sharad mohol murder case)
आता याप्रकरणी शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी देखील पोलीससात जबाब दिला आहे. यामध्ये त्यांनी धक्कादायक दावा केला आहे. गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून जीवाला धोका असल्याचा दावा स्वाती मोहोळ यांनी केला आहे. यामुळे मोहोळ कुटुंबीयांच्या जीवावर कोण उठले आहे? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Budget 2024 । अर्थसंकल्पात महिलांसाठी धडाकेबाज निर्णय, वाचा महत्वाच्या घोषणा
दरम्यान, पुण्यात नवीन पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी पदभार घेतला आहे. त्यांची ही पहिलीच पोस्टिंग आहे. पुण्यात मागच्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढली आहे ती मोडून काढण्याचे आव्हान आता त्यांच्यासमोर आहे.
Budget 2024 Live । अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी केली सर्वात मोठी घोषणा!