Sharad Mohol Murder Case । पुणे : काल पुणे शहरामध्ये भर दिवसा रक्तरंजित थरार घडला आहे. कारण पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये कुख्यात गुंड शरद मोहळचा (Sharad Mohal) गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला. गोळ्या झाल्यानंतर शरद मोहोळ याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने पुणे शहर चांगलेच हादरले आहे. (Sharad Mohal Murder Update)
या घटनेवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे टोळ्यांमधील युद्धाचे प्रकरण नाही, कारण शरद मोहोळची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली होती. ते म्हणाले, “अशा कुख्यात गुंडाना कसे सामोरे जायचे हे आमच्या सरकारला माहीत आहे. टोळ्यांमधील भांडणात सहभागी होण्याचे धाडस कोणीही नये.” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. Sharad Mohol Murder Case
Accident News । अतिशय भीषण अपघात! धुक्याचा अंदाज न आल्याने ट्रकने तरुणाला चिरडलं
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती
शरद मोहोळ याच्या हत्येची सीसीटीव्ही फुटेज देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज थरकाप उडवणारी आहे. या फुटेजमध्ये दिसत आहे की, शरद मोहोळ हा कोथरूड मधील सुतारदरा परिसरातून आपल्या घरातून बाहेर निघाला होता यावेळी अज्ञातांनी त्याच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. व्हिडिओमध्ये शरद मोहोळवर कशा पद्धतीने गोळ्या झाडल्या हे देखील स्पष्ट दिसत आहे.
Sharad Mohol News । शरद मोहोळ हत्या प्रकरणातील वकिलांनी न्यायालयात मांडली आपली बाजू