
Sharad Mohol murder case । पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर पुणे शहरात एकच खळबळ उडाली, याप्रकरणी दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. यावेळी पुणे पोलिसांनी या हत्या प्रकरणाची महत्त्वाची माहिती दिली आहे. या खून प्रकरणात अटक करण्यात आलेले दोन्ही वकील दीड तास आरोपींबरोबर असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपींना दोन्ही वकील खेड शिवापुर टोल नाक्यावर जाऊन भेटले. वकिलांचा आरोपी सरेंडर येण्याचा दावा देखील पोलिसांनी न्यायालयात फोडला. आरोपींना पोलिसांनाकडेसरेंडर व्हायचे होते मग त्यांनी सिम कार्ड का बदलले ? असा प्रश्न देखील उपस्थित केला. दरम्यान न्यायालयाने दोन्ही वकिलांना 11 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Sharad Mohol murder case)
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांकडे सरेंडर व्हायचे होते असा दावा ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडानयांनी केला होता. यानंतर पोलिसांनी आरोपींना सरेंडर करायचे होते तर सिम कार्ड का बदलले? त्याचबरोबर पुण्याच्या दिशेने न येता विरुद्ध दिशेने प्रवास का केला? दोन्ही वकील आरोपींना कोठे घेऊन जाणार होते? असे अनेक प्रश्न उपस्थित केले.
Sharad Mohal । शरद मोहळचा खात्मा करणारा मुन्ना पोळेकर नेमका कोण? जाणून घ्या
पोलिसांनी उपस्थित केलेल्या या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली. आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढवण्यास देखील विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर वकिलांच्या पोलीस कोठडी 11 जानेवारीपर्यंत वाढवली.