Sharad Mohol News । शुक्रवारी दुपारच्या सुमारास पुण्यातील कोथरूड परिसरात रक्तरंजित थरार घडला. कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या हत्येनंतर संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे. कोथरूड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गुंडाची हत्या होताच पोलिसांनीची तपास यंत्रणा कामाला लागले. पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. यामधील दोन जण वकील असल्याची माहिती समोर आली आहे.
Sharad Mohol Video । शरद मोहळच्या हत्येचे थरकाप उडवणारे सीसीटीव्ही फुटेज समोर
याप्रकरणी दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी दोन वकिलांची नावे समोर आली असून न्यायालयात आपली बाजू मांडताना वकिलांना अश्रू अनावर झाले आहेत. शरद मोहोळ खून प्रकरणांमधील आरोपींना काल न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी यामध्ये दोन वकिलांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावल्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ॲड रवींद्र पवार आणि ॲड संजय उड्डाण अशी वकिलांची नावे आहेत.
वकिलांना अश्रू अनावर
वकिलांनी आपली बाजू मांडताना न्यायालयामध्ये सांगितले की, “ज्यावेळी आरोपींनी शरद मोहोळ याची हत्या केली त्यावेळी त्यांना सिरेंडर करायचे होते. आम्ही देखील त्यांना तोच सल्ला दिला आणि त्याची माहिती पोलिसांना फोन द्वारे कळवली. त्याचबरोबर आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना देखील आम्ही तेच सांगितले. मात्र पोलिसांनी आमचे ऐकले नाही. आम्ही जवळपास पंधरा वर्षे झालं वकिली व्यवसाय करत आहोत आम्ही काहीही केले नाही” असे सांगत वकिलास न्यायालयातच अश्रू अनावर झाले होते.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती
शरद मोहोळ याच्या हत्येची सीसीटीव्ही फुटेज देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज थरकाप उडवणारी आहे. या फुटेजमध्ये दिसत आहे की, शरद मोहोळ हा कोथरूड मधील सुतारदरा परिसरातून आपल्या घरातून बाहेर निघाला होता यावेळी अज्ञातांनी त्याच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. व्हिडिओमध्ये शरद मोहोळवर कशा पद्धतीने गोळ्या झाडल्या हे देखील स्पष्ट दिसत आहे.