Sharad Mohol । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद मोहोळच्या पत्नीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

Sharad Mohal

Sharad Mohol । पुणे शहरामध्ये भर दिवसा रक्तरंजित थरार घडला आहे. कारण पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये कुख्यात गुंड शरद मोहळचा (Sharad Mohal) गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला. गोळ्या झाल्यानंतर शरद मोहोळ याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने पुणे शहर चांगलेच हादरले आहे. (Sharad Mohal Murder Update) दरम्यान आता शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Sharad Mohol Wife) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar । मोठी बातमी! मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

सूत्रांच्या माहितीनुसार, स्वाती मोहोळ यांनी डीपी रोडवरील पुणे शहर (Pune News) भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. स्वाती मोहोळ या पुणे भाजपच्या पदाधिकारी असून त्यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून चर्चांना उधाण आले आहे.

Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्याने केला ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि स्वाती मोहोळ यांच्यामध्ये काय चर्चा झाली? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.मात्र या मात्र या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

कोण होता शरद मोहळ? (Who was Sharad Mohal?)

शरद मोहोळ हा मुळशी तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील होता. त्याचे आई-वडील शेतकरी असून त्याची घरची परिस्थिती देखील हालाखीची होती. शरदने गुन्हेगारी क्षेत्रात सुरुवातीला कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा ड्रायव्हर म्हणून काम केले. मात्र संदीप मोहोळची ज्यावेळी हत्या झाली त्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारूपास आला. शरद मोहोळ यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

Ajit Pawar On Manoj Jarange । ब्रेकिंग! अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना दिला सर्वात मोठा इशारा!

तीन ते चार हल्लेखोरांनी हत्या केली

अधिकाऱ्याने सांगितले, “तीन ते चार हल्लेखोरांनी मोहोळ यांच्यावर कोथरूडमधील सुतारदरा येथे दुपारी 1.30 वाजता जवळून गोळ्या झाडल्या. एक गोळी त्याच्या छातीत तर दोन गोळ्या उजव्या खांद्याला लागल्याचे त्यांनी सांगितले. कोथरूड परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान 40 वर्षीय मोहोळचा मृत्यू झाला.

Supriya Sule । शरद मोहळच्या हत्येनंतर सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप!

Spread the love