Sharad Mohol । शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलीस तपासात सर्वात धक्कादायक माहिती उघड!

Sharad Mohal

Sharad Mohol । शुक्रवारी पुण्यात भर दिवसा झालेल्या हत्याकांडाने सर्वजण हादरले आहेत. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे. यामुळे पुण्यामध्ये एकच खळबळ माजली. शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्यानंतर तो यामध्ये गंभीर जखमी झाला यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र गंभीरित्या जखमी झालेल्या मोहाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही बातमी पुणे शहरासह संपूर्ण राज्यभर वाऱ्यासारखी पसरली. (Sharad Mohol)

Sharad Mohol Case । ब्रेकिंग! शरद मोहोळच्या पत्नीने फडणवीसांची भेट घेऊन केली ‘ही’ मोठी मागणी

दिवसाढवळ्या गुंडाला गोळ्या घातल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. 5 जानेवारी दिवशी हे हत्याकांड घडलं तो दिवस म्हणजे शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. शरद मोहोळ जेवण करून घरातून बाहेर पडला यानंतर आरोपी त्याच्याजवळ आले आणि खूप जवळून आरोपींनी शरद मोहोळ वर तीन ते चार गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडून आरोपी तिथून लगेच पळाले. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर पुण्यात दहशतीचे वातावरण होते.

Bus Accident । प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, अनेकजण गंभीर जखमी

फायरिंगवेळी आरोपींची घोषणाबाजी

मुन्ना पोळेकरने याने कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर फायरिंग केली आहे. यावेळी फायरिंग करत असताना पुण्यातील एका कुप्रसिद्ध गुंड्याच्या नावाने घोषणाबाजी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आरोपींने अशी घोषणाबाजी नेमकी का केली याचा तपास आता पोलीस यंत्रणा करत आहे.

Yash Birthday । KGF स्टार यशचे वडील अजूनही बस ड्रायव्हर, संघर्षाची कहाणी वाचून व्हाल थक्क

महिनाभरापासून हत्येचा कट

माहितीनुसार, हे हत्याकांड अचानक घडलं नसून या खुनाचा कट महिनाभरापासून शिजत होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद मोहोळच्या जवळचीच माणसे हा कट रचत होती आणि याचा शरद मोहळला कोणताही अंदाज नव्हता शरद मोहोळ याचा खून करणारी त्याच्या जवळची होती. हे पोलीस तपासातून समोर आले आहे.

Sharad Mohal । शरद मोहळची हत्या का झाली? भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

दहा वर्षांपूर्वी शरद मोहोळ आणि आरोपींचे भांडण झाले होते. यावेळी आरोपी लहान होते त्यावेळी शरद मोहोळने त्यांना मारहाण केली होती. तोच राग आरोपींच्या मनात धुमसत होता त्यामुळे त्यांनी फार पूर्वीच बदला घेण्याचे ठरवले होते. आणि त्यामधूनच त्यांनी शरद मोहोळच्या हत्येचा कट रचला. शरद मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवशी घरात जेवल्यानंतर आरोपींनी त्याच्या घराजवळच गोळ्या झाडून हत्या केली.

Sharad Mohol । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद मोहोळच्या पत्नीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

आठ जणांना पोलिसांकडून अटक

हत्या होताच पोलीस यंत्रणा वेगाने कामाला लागली. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी शरद मोहोळ याची हत्या करून पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्याच्या जवळ असणाऱ्या खाजगी जागी थांबले होते. त्यावेळी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकत आठही जणांना अटक केली असून आरोपींना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Ajit Pawar । मोठी बातमी! मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

पुण्यामध्ये ही घटना घडताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणाऱ्या गृह खात्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. तर दुसरीकडे आता भाजपच्या पदाधिकारी आणि शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी यांनी पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामध्ये मला न्याय मिळावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

Spread the love