Sharad Mohol | ब्रेकिंग! शरद मोहोळच्या हत्येमागील खरा मास्टर माईंड समोर; पोलिसांनी दिली माहिती

Sharad Mohol

Sharad Mohol | शुक्रवारी पुण्यातील कोथरूड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी तीन राऊंड गोळीबार केला. या गोळीबारानंतर मोहोळ याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, कोथरूडच्या गजबजलेल्या सुतारदरा येथे दुपारी 1.15 च्या सुमारास गोळीबार झाला. दरम्यान या प्रकरणामामध्ये पोलिसांनी आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Sharad Mohol Murder । शरद मोहोळ हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, दोन वकिलांनी…

मुन्ना पोळेकर हा मुख्य आरोपी असल्याचे बोलले जात आहे. मुन्ना हा मुख्य आरोपी असला तरी खरा मास्टरमाईंड कोण याबाबत माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रभारी सह आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Sharad Mohol Murder News)

Dhangar Reservation । धक्कादायक! धनगर आरक्षणासाठी युवकाचा टोकाचा निर्णय, संपवलं जीवन

कोण आहे तो मास्टरमाईंड?

शरद मोहोळ याच्या हत्येमधील आरोपी नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गडले यांचं पुर्ववैमनस्य होतं. याआधी देखील त्यांच्यामध्ये भांडणं झाल्याची तक्रार होती. फुल प्लनिंग करून शरद मोहळ याचा खून करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, मुन्ना पोळेकर त्याचा मामा नामदेव उर्फ पप्पू कानगुडेचाच माणूस होता. मुन्ना पोळेकर याने मोहोळ याच्याशी ओळख निर्माण करून विश्वासात घेतले. मागच्या पंधरा दिवसांपासून मोहोळच्या ऑफिससह तो त्याच्यासोबत फिरत होता.

Ajit Pawar । शरद मोहोळ हत्या प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुन्ना याचे इन्स्टा अकाऊंट पाहिले तर त्याने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये मामा आधारस्तंभ असल्याच्या अनेक पोस्ट केलेल्या आहेत. मामासोबत त्याचे अनेक फोटो असलेले पाहायला मिळतील. आरोपींमधील विठ्ठल गडले आणि नामदेव कानगुडे यांची आधीची भांडणं होतीच, त्यामुळे काटा काढण्यासाठी त्यांनी भाच्याला म्हणजचे मुन्ना पोळेकर याला मोहरा बनवलं असल्याची माहिती मिळत आहे.

Anganvadi Strike। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावर तोडगा निघेना, नऊ हजार कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

Spread the love