
पुणे येथे मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. यंदाच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) अनुपस्थित होते. आतापर्यंत प्रथमच असे घडले आहे. आजपर्यंत अनेकदा महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पाहण्यासाठी शरद पवार उपस्थित राहिले आहेत. यावेळी महाराष्ट्र केसरीच्या ( Maharashtra Keasari) निमंत्रित मान्यवरांमध्ये भाजपातील नेतेच जास्त दिसत होते. यामुळे शरद पवारांच्या अनुपस्थितीवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उत आला होता.
मोठी बातमी! विमान दुर्घटनेत ‘या’ प्रसिद्ध गायिकेचं निधन
दरम्यान काल शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना शरद पवार यांनी आपल्या अनुपस्थितीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. “मला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सोहळ्याचे निमंत्रण होते. परंतु, यावेळी मुंबईत काही महत्त्वाचे काम होते. त्यामुळे मी आलो नाही.” असे म्हणत शरद पवारांनी आपल्या गैरहजर राहण्याबाबत कारण दिले आहे.
कलिंगड शेतीतून तरुण घेतोय लाखोंचे उत्पादन; युवा शेतकऱ्याचा हा प्रयोग वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
यावेळी शरद पवारांनी आपण खेळाडू घडविण्यात हातभार लावत असल्याचे सांगितले आहे. आजपर्यंत अनेक खेळांना आणि खेळांडून पाठिमागून मदत करण्याची भूमिका मी घेत आलो आहे. इतकंच नाही तर क्रिकेटसाठीही मी काम केले आहे. मात्र कुस्तीसाठी मी विशेष प्रयत्न करत आलो आहे. अशी माहिती शरद पवारांनी यावेळी दिली.