Sharad Pawar । अजित पवार आमचेच नेते, शरद पवार यांचे मोठे वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

Ajit Pawar Our leader, Sharad Pawar's big statement; A source of discussion in political circles

Sharad Pawar । “अजित पवार आमचेच नेते आहेत काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचं कारण नाही असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे”. ते बारामती या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना त्यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Agriculture News । प्रत्येक शेतकऱ्यांना स्वतंत्र डीपी! काय आहे योजना? जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसह सविस्तर माहिती

महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच आशयाचे वक्तव्य गुरुवारी 24 ऑगस्ट रोजी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील केलं होतं. त्या वक्तव्याला आज पवारांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये नेमकं काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम देखील निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीमध्ये पडद्यामागे नक्की काय घडतंय याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.

Agriculture News । शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! शेतीसोबत दुध व्यवसायही धोक्यात

दरम्यान, शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण घटकांसाठी अनेक योजना येणार आहेत त्यामुळे त्या संपूर्ण योजनांवर शरद पवार यांच मन परिवर्तन होईल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. ते अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

Havaman Andaj : पुढील पाच ते सहा दिवस राज्यात कसा असेल हवामान अंदाज? जाणून घ्या एका क्लिकवर

Spread the love