Sharad Pawar । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार गट (Sharad Pawar Group) आणि अजित पवार गट (Ajit Pawar group) असे दोन गट पडले. काहीजण शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटात सामील झाले. दरम्यान पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कोणाची? अध्यक्ष कोण? चिन्ह कोणाचं? याचसोबत आमदार अपात्रता प्रकरणा संदर्भातही अनेक नाट्यमय घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
शरद पवार गटाने अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांना अपात्र करा अशी मागणी करणारे पत्र राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना लिहिल आहे. आता याला पलटवार म्हणून अजित पवार गटाने देखील शरद पवार गटांच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात याचिका लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवार गटातील नेत्यांची खासदारकी रद्द करा अशी मागणी करणारी याचिका अजित पवार गटाने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडे दाखल केली आहे. यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या याचीकेमध्ये अजित पवार गटाकडून शरद पवार , सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं वगळण्यात आली आहेत. आता या कृतीमुळे पुन्हा अजित पवार गटात सुरू असलेला संभ्रम अधोरेखित झाला आहे. त्याचबरोबर सध्या राजकीय वर्तुळात देखील अजित पवार गटाची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे.