Politics News । शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र, ‘या’ विषयावर झाली चर्चा

sharad pawar and Devendra fadanvis

Politics News । सोलापूर : आज स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या स्मारकाचे अनावरण आणि महाविद्यालय नामांतर सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच मंचावर आले होते. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर हे दोन्ही पहिल्यांदाच एकत्र आले होते. त्यामुळे ते मंचावर काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. (Latest Marathi News)

Chili Production । तिखट मिरचीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा! अवघ्या 3 महिन्यातच घेतले 55 लाखांचे उत्पन्न

परंतु मंचावर हे दोन्ही नेते हास्य विनोदात रमल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. “एकही दिवस सुट्टी न घेणारा, पावणे अकरा वाजता सभागृहात पहिले येणारे आणि सर्वात शेवटी जाणारे आमदार म्हणजे आबासाहेब देशमुख होते. त्यांच्या पुतळ्याच अनावरण करण्याचा योग आज मला आला. दुर्देवाने ते आपल्यात नाही”, अशी खंत फडणवीसांनी व्यक्त केली.

Business idea । बंपर कमाईची संधी! लाल भेंडीची लागवड करून मिळवा २५ लाखांचा नफा

पुढे ते म्हणाले की, “राजकारणातील शाश्वत सत्य म्हणजे आबासाहेब होय. 1980 साली इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांचे सरकार बरखस्त केले होते. त्यानंतर मंत्रिपदाची गाडी, सुरक्षा सोडून आबासाहेब एसटीने गावाकडे आले होते. राज्यातील दुष्काळाची दाहकता आणि दुष्काळाच दुखणं काय असते ते आम्हाला आबासाहेबांमुळे समजले, असेही फडणवीस म्हणाले.

Sushmita Sen । अभिनेत्री सुष्मिता सेनची खालावली प्रकृती, वडिलांनी घेतला टोकाचा निर्णय

दरम्यान, महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या या स्मारकाचे वजन 600 किलो इतके आहे. हे स्मारक संपूर्ण ब्रांज धातूपासून बनवण्यात आले असून त्याची उंची साडेआठ फूट असून त्याची उभारणी गजानन सलगर यांनी केली आहे.

Post Office Saving Schemes । पोस्ट ऑफिसची पती-पत्नीसाठी शानदार योजना, होईल 59,400 रुपयांचा फायदा

Spread the love