Sharad Pawar । रोहित पवारांना ईडीची नोटीस येताच शरद पवार यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले; ‘राज्यात लवकरच ईडी..

Sharad Pawar

Sharad Pawar । ईडीकडून (ED) काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अ‍ॅग्रोशी (Baramati Agro) संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली होती. ईडीने बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणी चौकशीचं समन्स बजावलं असून रोहित पवार यांनी येत्या बुधवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Latest marathi news)

Kishori Pednekar । बिग ब्रेकिंग! किशोरी पेडणेकर यांनाही ईडीचं समन्स, नेमकं कारण काय?

“केजरीवाल (Arvind Kejariwal) दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, पण चौकशा लावल्या जातात. त्यांचे मंत्री आज तुरुंगात आहेत. महाराष्ट्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर आरोप करून तुरुंगात टाकले. आगामी निवडणुकीत रामाच्या नावाचा वापर करण्यात येईल. सध्याचे राज्यकर्ते देशाला वेगळ्या वळणावर घेऊन जात आहेत. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे”, अशी जहरी टीका शरद पवार यांनी केली.

Manoj Jarange Patil । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील करणार राजकारणात एन्ट्री?

दरम्यान, लवकरच ईडी संघर्ष यात्रा सुरु होणार आहे, असेही शरद पवार म्हणाले आहेत. रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती ताजी असताना आता ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनाही ईडीने समन्स बजावले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याचे पडसाद आता काय उमटतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Rohit Pawar । सर्वात मोठी बातमी, रोहित पवारांना ईडीचं समन्स

Spread the love