sharad pawar: “चार, आठ, दहा दिवसात पत्राचाळ प्रकरणाची चौकशी करा “, शरद पवारांनी राज्य सरकारला केलं आवाहन

Sharad Pawar appealed to the state government to "investigate the letter case in four, eight, ten days".

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar)यांनी आज पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांना पत्राचाळ प्रकरणी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या बैठकीबाबत विचारण्यात आलं. तेव्हा शरद पवार (sharad pawar) यांनी पत्राचाळ प्रकरणी मौन सोडलं आहे.”पत्राचाळ प्रकरणाची चौकशी चार, आठ, दहा दिवसात जेवढ्या लवकर करायची तेवढी लवकर करा. आम्ही चौकशीला नाही म्हणत नाही, पण पराचा कावळा करू नका”, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

Anil Kapoor: “कोणत्या तीन गोष्टींमुळे तुम्ही अधिक तरुण दिसता?” प्रश्न विचारताच अनिल कपूर म्हणाले, “सेक्स, सेक्स, सेक्स.”

ईडीने (ED) दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये तुमचं नाव आल्याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर पवार म्हणाले की, त्यावेळी जी बैठक झाली. त्याचे जे मिनिटांबाबत प्रत तुम्हाला देत आहे. तसेच त्यावर सेक्रेटरीने सही केली आहे. दरम्यान त्या मिटिंगचा इतिवृत्तांत तुमच्याकडे दिला आहे. तसेच ईडीने दाखल केलेले चार्जशीट दाखल केली असून त्यावर माझं नाव आहे. दरम्यान इडी कोर्टात काय म्हणते, राज्य सरकारचं त्यावेळी जी चर्चा झाली. त्यात काय म्हटलं याचा उल्लेख जितेंद्र आव्हाडांनी केला, असं शरद पवार यांनी सांगितलं.

Anil Kapoor: “कोणत्या तीन गोष्टींमुळे तुम्ही अधिक तरुण दिसता?” प्रश्न विचारताच अनिल कपूर म्हणाले, “सेक्स, सेक्स, सेक्स.”

तसेच पत्रकार परिषदेत पुढे बोलताना पवार म्हणाले की, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर चांगलं झालं असतं. कारण त्याची जागाही ठरली होती. पण हा प्रकल्प गुजरातला गेला. खरतर या देशातच हा प्रकल्प होतोय म्हणून या प्रकल्पाला विरोध करणार नाही. पण महाराष्ट्रात झाला असता तर आनंद झाला असता. पुढे शरद पवार म्हणाले की,राज्य सरकारने गुंतवणुकीचं वातावरण तयार केलं पाहिजे. कारण मी मुख्यमंत्री असताना मी रोज दोन तास गुंतवणूकदारांना द्यायचो. त्यावेळी गुंतवणुकीचं वातावरण चांगलं होतं. पण आता त्याला धक्का बसला आहे. म्हणूनसर्वांनी राज्याच्या हितासाठी म्हणजेच गुंतवणुकीचं वातावरण तयार करण्यासाठी हातभार लावला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

Rohit Pawar: ” तरुणांच्या संतापाचा स्फोट होण्यापूर्वी…”, रोहित पवारांचा राज्य सरकारला गंभीर इशारा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *