Sharad Pawar । आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे ॲक्शन मोडवर आले आहेत. त्याचबरोबर बडे नेते पक्षांतर देखील करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या देखील लोकसभा निवडणुकीच्या आधीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा झटका दिला आहे. शरद पवारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात आधीच मोठी फूट पडली आहे आणि त्यानंतर आता शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेशशाला सुरुवात केली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे.
Supriya Sule । ब्रेकिंग! सुप्रिया सुळे दहा महिने घरी जाणार नाहीत; घेतला सर्वात मोठा निर्णय
माहितीनुसार, जळगावत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शहर महिला सरचिटणीस सीमा गोसावी यांनी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे. मनसेचे महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या प्रयत्नांनी शेकडो कार्यकर्त्यांनी आज मनसेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
Sunil Kedar । मोठी बातमी! सुनील केदार यांना पुन्हा एक मोठा धक्का
गेल्या चार वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात कुठलीही समस्या सुटत नसल्याने सीमा गोसावी यांनी मनसेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जळगावत मोठे खिंडार पडल्याची चर्चा सुरू आहे.