राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलीस चौकशी करत होते. दरम्यान आता सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ही अटक काल रविवारी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
Rain Update । राज्यातील ‘या’ भागांमध्ये आज पडणार मुसळधार पाऊस; यलो अलर्ट जारी…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे असं या आरोपीचं नाव आहे. सागर हा आयटी इंजिनिअर असून त्याला पुण्यामधून अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात आरोपीला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मालिका पाहणार्या पत्नीने टीव्ही बंद करण्यास दिला नकार, पतीने केले भयानक कृत्य; वाचून हादराल
दरम्यान, शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे ऍक्शन मोड मध्ये आल्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली लगेचच राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीला अटक केली आहे.
वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची घटना मनाला दुःख देणारी, अजित पवार संतापले