Sharad Pawar । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका (Assembly elections) नजीक आल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात गदारोळ उडाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या सक्रिय झाले असून, विधानसभा निवडणुकीसाठी विविध रणनीती तयार करत आहेत. त्यांनी भाजपला तगडा धक्का देण्यासाठी कोल्हापुरातील (Kolhapur) प्रमुख नेते समरजित घाटगे (Samarjit Ghatge) यांचा राष्ट्रवादी गटात समावेश केला आहे. यामुळे भाजपला (BJP) कोल्हापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे.
Hyundai । ह्युंदाईची ‘ही’ कार खरेदी करताल तर मिळेल 50 हजार रुपयापर्यंत सूट! वाचा संपूर्ण माहिती
याच पार्श्वभूमीवर, पुण्यातील भाजप नेता बापूसाहेब पठारे यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वडगाव शेरीतील माजी आमदार आणि भाजपचे प्रमुख नेते बापूसाहेब पठारे यांनी गणपती मंडळाच्या कार्यक्रमात तुतारी घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तुतारी हे चिन्ह असण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चेला जोर आला आहे.
Baramati News । बारामतीच्या राजकारणातून समोर आली सर्वात मोठी बातमी!
यातच, इंदापुरातील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश करण्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. इंदापुरच्या बाजारात आणि प्रमुख चौकात लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे फोटो असून, ‘इंदापूर तालुक्याची झाली तयारी… हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी’ असे मजकूर आहे. यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश करण्याच्या अटकळला वाव मिळाला आहे.
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे, आणि या बदलांमुळे राजकीय पटलावर मोठे उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात या चर्चांचे स्पष्टीकरण मिळण्याची शक्यता आहे.