Sharad Pawar । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. नेते पक्षांतर करताना आपल्याला दिसत आहेत. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. यामध्येच आता शरद पवार गटातील नेता भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Abhishek Ghosalkar Case । अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात धक्कादायक CCTV फुटेज समोर
राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शरद पवार गटाचे (Sharad Pawar group) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. “भाजपच्या प्रवेशाबाबत एकनाथ खडसे यांचे अनेक निरोप येत आहेत. याबाबत मला काहीच विचारणा झाली नाही. कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. त्यांची वर काही लाईन असेल तर त्यांनी लावावी. असे मोठे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे.
एकनाथ खडसेंनी दिल स्पष्टीकरण
“गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे.” असे एकनाथ खडसे यांनी ट्विट केले आहे.
गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 13, 2024