Sharad Pawar । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवारांबद्दल एक महत्वाचे विधान केले, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
झिरवाळ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट असले तरी मला शरद पवारांचा दुरून आशीर्वाद आहे.” त्यांनी धनराज महाले यांच्या उमेदवारी अर्जावर टीका करत विश्वास व्यक्त केला की, महाले अर्ज मागे घेतील. “विकासाच्या मुद्द्यावर जनता मला निवडून देईल,” असे ते म्हणाले.
Indapur News । इंदापूरच्या राजकारणाबाबत मोठी बातमी! तीन बडे नेते निवडणुकीच्या रिंगणात
झिरवाळ यांचे हे विधान राज्यातील राजकीय वातावरणात नवे वारे घालणारे ठरले आहे. दिंडोरी मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरु असून, झिरवाळ यांनी त्यांचा विश्वास व्यक्त केला आहे की ते या निवडणुकीत 100 टक्के निवडून येतील. आता या विधानांचा परिणाम निवडणुकांच्या निकालावर काय होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Rohit Pawar । राजकारणातून मोठी बातमी! रोहित पवारांच्या धक्कादायक दाव्याने खळबळ