Sharad Pawar । विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला (Sharad Pawar group) राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commissions) मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निवडणूक चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक आयोगाने कायम ठेवले असून, ‘पिपाणी’ आणि ‘तुतारी’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय.
Samsung Galaxy M35 5G भारतात लॉन्च, चांगल्या कॅमेरासह जाणून घ्या ‘ही’ खास वैशिष्ट्ये
शुक्रवारी राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार पक्ष ) नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्राचे वाचन केले. राज्य निवडणूक आयोगाने 30 नोव्हेंबर 2019 रोजीच्या अधिसूचनेच्या परिशिष्ट 3 मध्ये अनुक्रमांक 172 वर पिपाणी आणि अनुक्रमांक 173 वरील ‘तुतारी’ हे मुक्त चिन्ह गोठवले जात असल्याचे पत्र जारी केले आहे.
Poltics News । अजित पवारांच्या पक्षाने भाजपपुढे ठेवली मोठी मागणी, निवडणुकीपूर्वीच सुरू केली तयारी!
जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाने काढलेले पत्र वाचून दाखवले. दि. 30 नोव्हेंबर 2019 च्या अधिसूचनेतील परिशिष्ट 3 मधील अनुक्रमांक 172 वरील ‘बिगुल’ (पिपाणी) आणि अनुक्रमांक 173 वरील ‘तुतारी’ ही मुक्त चिन्ह गोठवण्यात येत आहेत, असे पत्रक राज्य निवडणूक आयोगाने काढले असून जयंत पाटील यांनी माहिती दिली.
Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीचा कृती आराखडा बनवला, पक्ष इतक्या जागांवर लढणार