Sharad Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या चाळीस आमदारांसह राष्ट्रवादीसोबत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. आमदाराने बंड केल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. हे त्यानंतर पक्ष सावरण्यासाठी आणि पक्षाचा ताबा आपल्याकडे म्हणून शरद पवार अनेक प्रयत्न देखील करत आहेत. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव देखील घेतली आहे. एकीकडे शरद पवार पक्ष सावरण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
Eknath Shinde । एकनाथ शिंदेंना मोठा झटका! वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे
राष्ट्रवादीचा धुळ्यातील एका बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर येत आहे. हा नेता आज पत्रकार परिषदेत घेऊन याबाबत अधिकृत माहिती देणारा आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि धुळ्यातील बडे नेते अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादीला राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
याबाबत अनिल गोटे पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची अधिकृत माहिती देणार आहेत. त्याचबरोबर राजीनामा का दिला ? याची देखील माहिती देणार असून ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याचबरोबर ते इतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत याची देखील माहिती पत्रकार परिषदेमधून स्पष्ट करणार आहेत.
Politics News । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रेवर सुनावणी घेणार