Sharad Pawar | सध्या शिवसेना आमदार अपात्र (Shiv Sena MLA disqualified) प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला आहे. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष राष्ट्रवादी आमदार अपात्र (Ncp MLA disqualified) प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीकडे आहे. 31 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावर निकाल देण्याची शक्यता आहे. मात्र या निकालाआधीच शरद पवार गटाला (Sharad Pawar group) एक मोठा धक्का बसल्याची माहिती मिळत आहे.
Pune Accident News | पुण्यात भीषण अपघात! कारचालकाने 4 ते 5 दुचाकींना चिरडल…
शरद पवार गटातील सोलापूर मधील चार खंदे समर्थक अजित पवार गटात (Ajit Pawar group) सामील होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर महापालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, माझी गटनेते तौफिक शेख त्याचबरोबर नगरसेवक इरफान शेख यांनी मंगळवारी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यानंतर या चारही सेवकांनी अजित पवार गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात समोर आली सर्वात मोठी बातमी! आज राज्य सरकारकडून…
महिनाअखेरीस चारही सेवक अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाची गोष्ट शरद पवार लवकरच सोलापूरचा दौरा करणार आहेत. मात्र या दौऱ्याआधीच चार माजी नगरसेवकांनी साथ सोडल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
Pune Crime | ब्रेकिंग न्यूज! पुणे शहरात आणखी एका गुंडाची हत्या