Sharad Pawar । महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसापासून अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला.
यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. त्यापैकी एका गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला नोटीस बजावली आहे. (Sharad Pawar)
भीषण अपघात! देवदर्शनाला आलेल्या भाविकांची बस पलटली, दहा ते पंधरा भाविक गंभीर जखमी
माहितीनुसार, अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. अजित पवार यांच्या या याचिकेवर आता शरद पवार गटाला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. शरद पवार गटाला म्हणणं मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर पक्ष नक्की कुणाचा याबाबत निवडणूक आयोगात याचिका सुरु होईल.