Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवारांची 10 पैकी 10 जागांवर जोरदार मुसंडी

Sharad Pawar

Sharad Pawar । राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार यांच्या उमेदवार सुप्रिया सुळे 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत. शरद पवारांनी जोरदार मुसंडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीमध्ये 10 जागांवर निवडणूक लढवली होती, त्या दहाही जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Shirur Election Results । शिरूरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! अमोल कोल्हेंनी आढळरावांना टाकलं मागे

शिरूर मतदारससंघात अमोल कोल्हे अगदी पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. बीडमध्ये बजरंग सोनवणे यांनी तब्बल 8 हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भाजप उमेदवार पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत. त्याचबरोबर साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेंनी मोठी आघाडी घेतली आहे. याचबरोबर सर्वात जास्त चर्चेत राहिलेला माढा मतदारसंघ येथेही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

Supriya Sule । ब्रेकिंग! बारामतीतून पहिल्या फेरीत सुप्रिया सुळे आघाडीवर; अजित पवारांना धक्का

दिंडोरी, माढा. रावेर, भिवंडी , वर्धा, अहमदनगर दक्षिण या जागांवर (NCP Sharad Pawar Lok Sabha Election) शरद पवार गटाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

BJP l सर्वात मोठी बातमी! भाजपने उधळला विजयाचा गुलाल; ‘या’ उमेदवाराने फडकावला विजयाचा पताका

Spread the love