Sharad Pawar । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कडवट शब्दात टीका केली. पवार यांनी मोदी सरकारच्या नेतृत्वावर तीव्र आरोप करत म्हटले, “गेल्या 10 वर्षांपासून मोदी सरकार सत्तेत आहेत. मात्र, शेतकऱ्यांची आत्महत्या कमी करण्यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाही” अशी टिका केली आहे.
Bjp । सर्वात मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सर्वात मोठा झटका
पवार यांनी मोदींच्या 400 लोकसभेच्या विजयाच्या आकड्याला देखील लक्ष्य केले. ते म्हणाले, “मोदींनी लोकसभेला 400 पारचा नारा दिला होता, मात्र त्यांचा डाव फसला. लोकांना समजले की देशाची घटना बदलण्याचा त्यांचा विचार आहे, आणि त्याला त्यांनी विरोध केला.” पवारांनी एकाच वेळी शेतकऱ्यांवरील सरकारच्या अपयशावर टीका केली आणि ते म्हणाले, “मोदी सरकारच्या काळात 700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेत. आम्ही सत्ता असताना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कर्जमाफीची योजना आणली होती, मात्र मोदी सरकारने ती योजनेसाठी काहीही केले नाही.”
पवार यांनी महिलांच्या सुरक्षेबाबतही सरकारवर तिखट प्रतिक्रिया दिली. “आज महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. सरकार महिलांसाठी योजना आणण्याचा विचार करत आहे, पण त्याऐवजी त्यांना सुरक्षा द्या,” असे ते म्हणाले.”
Bjp । सर्वात मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सर्वात मोठा झटका