Sharad Pawar । निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar group) दिले. यानंतर शरद पवार यांना मोठा धक्का बसला. दरम्यान आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचीका दाखल केल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.
यामध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी शरद पवार गटाने केली आहे. वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी हे प्रकरण मेन्शन केल्याची माहिती मिळते. शरद पवार गटाने याचिका दाखल केल्यानंतर यावर लवकरच सुनावणीची तारीख देऊ असे देखील सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यामध्ये शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी मागणी केली आहे की, “या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी व्हावी कारण अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील आम्हाला अधिवेशनात व्हीप बजावू शकतात.” अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल की सुनावणीची नक्की तारीख काय असेल.
firing । गोळीबाराची धक्कादायक घटना! घरासमोरच अंदाधुंद फायरिंग