Site icon e लोकहित | Marathi News

शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला आयोध्या दौऱ्यावरून सुनावले, म्हणाले…

Sharad Pawar briefed Shinde-Fadnavis government on Ayodhya tour, said...

शिंदे-फडणवीस सरकारचा आयोध्या दौरा मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या बहुचर्चित दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) रवाना झाले असून कालच ते अयोध्येत पोहोचले आहेत. दरम्यान आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) देखील आयोध्येला रवाना होणार आहेत. या दौऱ्यात संपूर्ण मंत्रिमंडळ सहभागी होणार असून आयोध्येमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री प्रभू श्रीरामाची महाआरती करणार असून राम मंदिराची पाहणी करणार आहेत.

अभिनेत्री राणी मुखर्जी रोज घालते नवऱ्याला शिव्या; कारण ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क

या दौऱ्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी देखील आयोध्या दौऱ्यावरून शिंदे व फडणवीस यांना धारेवर धरले आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, ” ज्यांनी हा कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्यांनी आयोध्या दौरा हा त्यांच्या श्रद्धेचा प्रश्न असल्याचे सांगितले आहे. त्यांची श्रद्धा तिथे आहे. आमची श्रद्धा शेतकऱ्यांसाठी असून त्यांच्या डोळ्यातील पाणी कसे पुसता येईल? या विचारात आमची श्रद्धा आहे.”

या चार पाच पोरींना खोऱ्याने पैसा मिळतोय, जेष्ठ तमाशा कलावंताची गौतमी पाटीलवार जोरदार टीका

दरम्यान, शरद पवार यांनी राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर सुद्धा वक्तव्य केले आहे. ” प्रत्येक नेत्याला समजलं पाहिजे की, कसं बोलावं? कोणत्या प्रश्नासाठी आग्रह धरावा? लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यांना शिवीगाळीचा रस्ता योग्य वाटत असेल तर त्यांचा अधिकार आहे.” असे शरद पवार म्हणाले.

सर्वात मोठी बातमी! राज्यात अवकाळी-गारपिटीचा तडाखा, नद्या दुथडी भरून वाहिल्या

Spread the love
Exit mobile version