Sharad Pawar । “शरद पवार कधीही कुणाशी युती करू शकतात”; शिंदे गटाच्या नेत्याचं खळबळजनक विधान

"Sharad Pawar can form an alliance with anyone anytime"; Sensational statement of Shinde group leader

Sharad Pawar । राज्यात सध्या शिंदे-फडणवीस-पवार सरकार (State Government) आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) फुटीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक सामनेसामने येतात. त्यावरून राजकीय वातावरण तापते. अशातच आता शिंदे गटाच्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावरून पुन्हा राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Latest Marathi News)

Vaidyanath Sugar Factory । पंकजा मुंडेंना मोठा दणका! तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

“शरद पवार कधी कुणाशी युती करतील सांगता येत नाही. त्यांची कुणालाही खात्री नाही. कधीही ते कोणत्याही पक्षात जातात. त्यामुळे त्यांच्या राजकारणावर सहजसहजी कुणीही विश्वास ठेवत नाहीत. शरद पवार यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणारी एकही व्यक्ती नाही,” अशी जहरी टीका शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली आहे.

Loksabha Election 2024 । बारामती मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

“आज शरद पवार ‘इंडिया’ आघाडीत आहेत, परंतु उद्या ते तुम्हाला दुसऱ्या पक्षासोबत दिसतील तर परवा ते ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत पाहायला मिळतील. त्यांच्या भूमिकेवर कुणी विश्वास ठेवत नसल्याने त्यांनी उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांची भेट घेतली. तसेच ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (Narendra Modi) भेटत असतात”, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी निशाणा साधला आहे. त्यांच्या या टीकेला शरद पवार कशाप्रकारे उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Ganesh Festival । काय सांगता? गणेश मूर्तीच्या डोळ्यात अश्रू, भाविकांची प्रचंड गर्दी

Spread the love