Sharad Pawar । लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) तोंडावर आल्या आहेत. अनेक पक्ष आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या करत आहेत. मागच्या काही दिवसापासून शरद पवार गटाच्या (Sharad Pawar group) साताऱ्याच्या जागेबाबत पेच निर्माण झाला आहे. मात्र आता सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्याच्या जागेचा सस्पेन्स आता संपला आहे. महाविकास आघाडीकडून साताऱ्याच्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आता शशिकांत शिदे (Shashikant Shide) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ट्विटरवरून नाव जाहीर
तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया! असं ट्विट NCP च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले आहे.
Rashmi Barve । मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा रश्मी बर्वे यांना सर्वात मोठा धक्का
दरम्यान, महायुतीने अद्याप साताऱ्यासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही मात्र उदयनराजे यांनाच इथली उमदेवारी मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. जर महायुतीने उदयनराजेंना लोकसभेसाठी तिकीट दिल्यास साताऱ्यामध्ये मविआचे शशिकांत शिंदे वि. महायुतीचे उदयनराजे भोसले असा सामना रंगू शकतो.
Sudhir Mungantiwar । सुधीर मुनगंटीवारांच्या अडचणीत होणार वाढ, नेमकं प्रकरण काय?