Sharad Pawar । महाराष्ट्रात बारामतीच्या जागेवर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार (Supriya Sule vs Sunetra Pawar) यांच्यात लढत आहे, त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल. सत्ताधारी आणि विरोधक लोकसभेच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच खासदार शरद पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. (Latest marathi news)
Baramati Loksabha । सुनंदा पवार यांचं खळबळजनक वक्तव्य’ म्हणाल्या, “दोन-तीन दिवसांमध्ये…”
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे (NCP) जे दिग्गज नेते सत्तेत सहभागी झाले त्यांची सत्तेत सहभागी होण्यापूर्वी काय अवस्था होती, त्यांचं काय मत होतं, याबाबत शरद पवार यांनी खुलासा केला आहे. “ते गेले, ते अनेक वर्ष पक्षाचे काम करत होते. आम्ही त्यांना अनेक पदं दिली असून हे सगळं असताना सुद्धा त्यांनी काही प्रश्न माझ्यासमोर उपस्थित केले होते. मी असं एकाचं नाव घेत नाही. पण काही लोकं होती. ते प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यानंतर मी मला शक्य नाही, मला योग्य वाटत नाही, असं म्हटल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला,” असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
Lok Sabha Election 2024 । लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज होणार मतदान
“मला असा अंदाज आहे की जी फाईल टेबलवर जाईल ती नरेंद्र मोदींच्या विचारांसोबत गेल्यानंतर ती फाईल कपाटात ठेवली जाईल. आता ती समजा नाही. उद्या त्यांना वाटेल तेव्हा ती फाईल कधीही काढली जाईल. त्यामुळे आजचं मरण उद्यावर गेलं, असं वाटलं तर त्यात काही गैर नाही. पण त्यांच्या डोक्यावर कारवाईची तलवार नेहमी टांगती राहील,” असा खळबळजनक मोठा दावा शरद पवार यांनी केला आहे.