राज्याच्या राजकारणामध्ये सध्या अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता येणार नाही. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक मोठा खुलासा केला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सिल्व्हर ओकवर बैठक झाली. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे.
नागपूरच्या वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे कडाडले! विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले…
शरद पवार म्हणाले, “माझ्या कुटुंबातील व्यक्तीवर भाजपसोबत जाण्यासाठी दबाव आणला जात आहे. कुणाला त्यांच्यासोबत जायचं असेल तर तो ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरे सांगितलं आहे असा दावा राऊतांनी केलाय.
अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की…
राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत असतानाच राऊतांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांनी ‘सामना’तील आजच्या ‘रोखठोक’मधून हा दावा केलाय. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.